पृष्ठे

रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं
भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्रीः |
इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार ||

- रात्र संपेल , पहाट होईल , सूर्य उगवेल ,कमळे हसू लागतील (फुलतील) आणि मी येथून बाहेर पड़ेन असा विचार रात्री कमळ मिटल्याने त्यात अडकलेला भुंगा करीत आहे .पण अरेरे! काय हे दुर्दैव ! ते कमळ(च) हत्तीने उपटले.

८ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

It was nice to see the Shlok after a long time. I think the word is second line is not "Pankajshri". I think it was "Chakrawakam". Which is another synonym for Lotus.
But still this is one of my favourite sholk. The other one is "Kalay Tasme Namah..." too good.)

( Wanted to give the comment in marathi.. but had a real hard time typing it.so left it is in english)

आश्लेषा म्हणाले...

Anonymous ,thanks for the comment :)

shantanu म्हणाले...

आपण आपल्या सुभाषिताला शीर्षक का देत नाही? उदा. हा हन्त हन्त असे शिफ्प्मर्षक शोभून दिसले असते. असो. आपला उपक्रम उत्तम आहे यात शंकाच नाही.

आश्लेषा म्हणाले...

धन्यवाद shantanu.सुभाषिताला कायमच शीर्षक देता येईल असे वाटत नाही म्हणून देत नाही .पण "labels " मात्र देते.

SLEZ म्हणाले...

शेवटच्या ओळीतील "नलिनीं गज उज्जहार" याचा अर्थ "कमळ हत्तीच्या पायाखाली तुडवले गेले" असा न करतां "हत्तीने कमळ(च) उपटले" असा करावा, असें सुचवावेसे वाटते.
खरं तर, द्विरेफे हा समास कसा सोडवावा आणि त्यातल्या रेफ ह्या स्वतंत्र शब्दाचा शब्दकोषानुसार नेमका अर्थ काय याचं संशोधन करीत मी आपल्या संकेतस्थळावर पोंचलो !
आपला उपक्रम सुंदर आहे. आपण माझ्याही
http://slabhyankar.wordpress.com
http://sanskrit4marathimanoos.com
ह्या ब्लॉगवर टीकाटिप्पणी द्याव्यात.
धन्यवाद
श्रीपाद अभ्यंकर

आश्लेषा म्हणाले...

धन्यवाद SLEZ ,आपली सूचना बरोबर आहे. योग्य तो बदल केला आहे.

SLEZ म्हणाले...

प्रिय आश्लेषा,
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं भास्वानुदेष्यत...": हयाच श्लोकावर अधिक सविस्तर चर्चा आपल्याला http://slabhyankar.wordpress.com येथील Lesson 8 मधे वाचायला मिळेल.
"रेफ्" हया शब्दाचा सुद्धा दरम्यानच्या वेळात मिळाला तो देखील तिथे दिलेला आहे.
तिथल्या पाठाबद्दल आपल्या टीका - टिप्पणी जरूर कळवाव्यात.
खास मराठी लोकासाठी http://sanskrit4marathimanoos.wordpress.com असा उपक्रम देखील सुरूं केला आहे.
धन्यवाद
सस्नेहम् ,
अभ्यंकरकुलोत्पन्नः श्रीपादः |
श्रीपतेः पदयुगं स्मरणीयम् ।

आश्लेषा म्हणाले...

SLEZ , आपण दिलेल्या दोन्ही links पहिल्या. अतिशय उत्तम पद्धतीने आपण संस्कृतचे पाठ दिलेले आहेत . संस्कृत जाणून घ्यायची इच्छा असलेल्या माझ्यासारख्या अनेक लोकांना याचा निश्चित उपयोग होईल.