पृष्ठे

यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्त:।
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या
धिक्ताञ्च तं च मदनं च इमां च मां च ||

-मी जिचा सतत विचार करतो ती माझ्याबाबतीत विरक्त आहे, तिला दुसराच कोणी आवडतो आणि त्याला अजून वेगळीच कोणीतरी आवडते. अजून तिसरीच कोणीतरी माझी अभिलाषा धरून आहे .तिचा ,त्याचा ,मदनाचा ,त्या स्त्रीचा आणि माझाही धिक्कार असो.

२ टिप्पण्या:

Vinay म्हणाले...

हा श्लोक खूपच आवडला!!! मजेदार आहे.

अनामित म्हणाले...

> धिक्ताञ्च तं च
>
माझ्या माहितीनुसार 'धिक्‌ ताम्‌ च तं च' हे शब्द वेगळेच राहतात. 'तां च' पासून 'ताञ्च' संधी केल्यास 'तं च' चा 'तञ्च' का होऊ नये, इया मम शंका. पण मला अशी संधी होतच नाही, असं सांगता येणार नाही. ती संधी न झालेली मात्र मी विश्वसनीय सुत्रांत पाहिलेली आहे. आणि या श्लोकात प्राणप्रिय पत्नीकडून प्रेम न मिळालेल्या भर्तृहरीचा तळतळाट असल्यामुळे 'मजे'पेक्षा प्रतारणा, माणसाची मृगजळामागची धाव या दाहक गोष्टीच जास्त लक्षात राहतात. मात्र प्रथमदर्शनी वाचकाची हा श्लोक 'मजेदार' असल्याची प्रतिक्रिया नक्कीच होऊ शकते.

- डी एन