नरनारीसमुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता |
अमुखी कुरुते शब्दं जातमात्रा विनश्यति ||

- स्त्री आणि पुरुष यापासून तिची उत्पत्ती झाली असून त्या स्त्रीला देह नाही . तोंड नसूनही ती आवाज करते आणि जन्माला येताच नाश पावते ।

कोड्याचे उत्तर? - चुटकी- अंगठा (पुरुष) व मध्यमा (मधले बोट - स्त्री) यापासून चुटकी निर्माण होते. तिला स्त्रीदेह तर नसतोच पण तोंड नसूनही आवाज करते. तसेच वाजविल्या वाजविल्या संपते (एकावेळेस एकदाच वाजविता येते)

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

सा स्त्री देहविवर्जिता |
- तिला स्त्रीदेह नाही
------

आश्लेषाबाई: आपण मराठी लोक नको तिथे सामासिक शब्द तोडतो. 'परमानन्द माधवम्‌', '(दिव्या) गीर्वाण भारती' या चूक रचना आहेत. अशा ठिकाणी पूर्ण शब्दांत दिव्या गीर्वाण-भारती‌ अशी वाचनसुलभतेसाठी खूण करायची विनोबांची रीत मला आवडते. वर मात्र 'सा स्त्री' हे दोन वेगळे शब्द आहेत. तस्मात्‌, 'तिला स्त्रीदेह नाही' ऐवजी
'त्या स्त्रीला (स्त्री-लिंगी-thingie-ला)
देह नाही' असा अर्थ आहे.
फार कृत्रिम कोडं आहे.

अनामित म्हणाले...

Upon second thoughts, सा स्त्रीदेहविवर्जिता also makes for good logical flow. That would mean : she has no female-body-form. Why सा स्त्रीदेहविवर्जिता, instead of just सा देहविवर्जिता? Perhaps for metrical considerations?

OTOH सा स्त्री देहविवर्जिता makes sense, too, but that construct means: that woman has no bodily form, not 'she has no female-body-form'. I think this thrust is more likely. After calling the thumb 'nara' and the middle finger 'naaree', the snap is called 'stree'.

अनामित म्हणाले...

I am told to offer a suggestion. I don't know how you missed it, and don't know how I missed it.

Not टिचकी (click), but चुटकी (snap) ?

And while सा स्त्री देहविवर्जिता and सा स्त्रीदेहविवर्जिता essentially mean the same thing, the exact map for the former is 'that woman sans bodily-form', and the latter maps to 'she who hath no female-body-form'.

While we are at it, while Kalidas was pointing to the inseparable-ness (nay, one-ness) of Shiva and Parvati in 'पार्वतीपरमेश्वरौ', if it is made to split पार्वतीप-रमेश्वरौ instead of पार्वती-परमेश्वरौ, we are talking about the adwait of Shiva (paarvatee's pati) and Rameshwar Vishnu. This is just a play upon that word. I believe Kalidas did not intend that trickery and simply meant to talk about Shiva and Parvati only.

- dn

अनामित म्हणाले...

चुटकीला गीर्वाणभाषेत 'छोटिका' असा शब्द आहे, असे माझे एक मित्र मला बोलले.

- नानिवडेकर