विधिरेव विशेष गर्हणीय: करट त्वं रट कस्तवापराध:|
सहकारतरौ चकार यस्ते सहवासं सरलेन कोकिलेन||
- हे कावळ्या,आंब्याच्या झाडावर एका गोड आवाजाच्या कोकीळ पक्ष्याबरोबर राहूनही तू वाईट आवाजातच ओरडतोस यात तुझा काहीच अपराध नाही...ह्यात दोष नियतीचा आहे.(कारण कावळ्याचा आवाज मुळातच चांगला नसतो) म्हणजेच जी गोष्ट तुमच्याजवळ मुळातच नाही,ती गोष्ट फक्त ज्यांच्या जवळ ती आहे त्यांच्या बरोबर राहून मिळवता येत नाही.
सुखं वा यदि वा दु:खं, प्रियं वा यदि वा अप्रियम् ।
प्राप्तं प्राप्तम् उपासीत हृदयेन अपराजित: ॥
- सुख किंवा दु:ख ,प्रिय किंवा अप्रिय ,जे जे आपणास प्राप्त होईल ते ते सर्व मनाने खचून न जाता भोगावे.

लेबल:
सुख-दु:ख
जातस्य हि धृवो मृत्यू: धृवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्यार्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥
- जो जन्मला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू पावला आहे त्याचा (पुन्हा) जन्मदेखील निश्चितच आहे.म्हणून (मृत्यूसारख्या) अटळ अशा गोष्टीबद्दल शोक करणे योग्य नाही.

जन्म-मृत्यू
तावत् प्रीतिर्भवेत् लोके यावद् दानं प्रदीयते ।
वत्स: क्षीरक्षयं दृष्ट्वा परित्यजति मातरम् ॥
-या जगात जोवर आपण कोणाला काही देत असतो तोवरच त्यांना आपण आवडतो आणि त्यांचे आपल्यावर प्रेम असते.गाईचे दूध यायचे कमी झाले की वासरु तिला टाकून तिच्यापासून दूर जाते.

प्रेम
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)