पृष्ठे

उद्योग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उद्योग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यथैकेन न हस्तेन तालिका सम्प्रपद्यते |
तथोद्यमपरित्यक्तं कर्म नोत्पादयेत् फलम् ||

- जसे एका हाताने टाळी वाजत नाही तसेच उद्योग न करता केवळ कर्माच्या (नशिबाच्या) जोरावर फळ मिळत नाही.
उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ||

- उद्योग (प्रयत्न) केल्यानेच कामे पूर्ण होतात नुसती स्वप्ने बघून नाही .झोपलेल्या सिंहाच्या जबड्यात हरणे स्वत:हून प्रवेश करीत नाहीत.(सिंहाला त्यांची शिकार करावीच लागते.)