अग्नि: शेषं ऋण: शेषं शत्रु: शेषं तथैव च।
पुन: पुन: प्रवर्धेत तस्मात् शेषं न कारयेत् ||
- शिल्लक राहिलेली आग , शिल्लक राहिलेले कर्ज आणि शिल्लक असलेला शत्रु हे पुन्हा पुन्हा बलवान होऊ शकतात (आणि त्रास देऊ शकतात) म्हणून ह्या गोष्टी कधीही थोड्यादेखील शिल्लक ठेवू नयेत.