पृष्ठे

सुवर्ण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुवर्ण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अग्निदाहे न मे दुःखं छेदने निकषे न वा |
एतदेव महद्दुःखं गुञ्जया सह तोलनम् ||

- सोने म्हणते - मला आगीमध्ये तापविल्याने, तोडल्याने किंवा कस ठरविण्याने (त्यासाठी दगडावर घासल्याने)दुःख होत नाही.पण मला गुंजेसारख्या निकृष्ट प्रतीच्या पदार्थाबरोबर तोलले जाते याचे मात्र अतिशय दुःख होते.

ही सुवर्णान्योक्ती आहे . सोन्याला इतर कोणत्याही त्रासाचे दुःख वाटत नाही पण अपमानाचे वाटते.तसेच थोर माणसे कोणतेही दुःख सहन करतील पण त्यांना अपमानाचे दुःख असह्य होते.