भोजस्य भार्या मदविव्हलाया:
कराच्युतो हेमघटोपिपात्रम् |
सोपान मार्गेण प्रकरोति शब्दम्
ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: ||
- कामविव्हल झालेली भोजराजाची पत्नी जिन्यावरुन जात असताना तिच्या हातातील सोन्याचा घडा पडून ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: असा आवाज झाला.
याच समस्यापूर्तीचे अजून एक सुभाषित येथे आहे.
५ टिप्पण्या:
भोजस्य भार्या मदविव्हलाया:
---
ही उपज़ातीतली रचना आहे. काही ओळी इंद्रवज्रेत, काहींना उपेन्दवज्रा. पहिली आणि तिसरी ओळ इथे इन्द्रवज्रा मधे आहेत. दुसरी उपेन्द्रवज्रा. उपज़ातीच्या नियमांनुसार चौथी कशातही चालेल, पण उपेंद्रवज्रेत जास्त बरी.
ती ओळ : ठं ठं ठं ठं ठं ...
ऐवजी
ठ ठं ठ ठंठं - ठ ठ ठं - ठ ठं ठ:
अशी हवी.
Now I see that the last line is correct; it's in Indravajraa, but that is perfectly okay. I don't know whether you corrected it after seeing my feedback; but if it was correct to start with, please accept my apologies.
मी अजून तरी काहीच बदल केला नाहीये आणि मला अजून जुनीच ओळ दिसत आहे.
तरीही मी आपण सांगितलेला बदल करते. इतकी चांगली सुधारणा सांगितल्याबद्दल धन्यवाद.
मी काही संस्कृत खूप जाणत नाही. म्हणून मला उपज़ाती, इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा म्हणजे काय हे माहीत नाही.
आपण कृपया थोड़ी माहिती देऊ शकाल का?
आश्लेषाबाई : इंद्रवज्रा वृत्तात प्रत्येक ओळीत ११ अक्षरे असतात. त्यांचा लघु-गुरु (र्हस्व-दीर्घ, ल-गा) क्रम विशिष्ट हवा.
गेला अहो देश रसातळाला
श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये
गा-गा- लगागा ललगा लगागा
या ओळीत पहिला वर्ण लघु केला की उपेन्द्रवज्रा.
मनोजवं मारुततुल्यवेगं .
या दोन्ही वृत्तांची मिसळ करण्याची छन्दशास्त्रात मुभा आहे. दोन वृत्तांची (शास्त्रमान्य) भेसळ उपज़ाती म्हणून ओळखतात.
यापेक्षा खोलात माहिती हवी असेल तर मला ईमेल करा.
- नानिवडेकर
माहिती दिल्याबद्द्दल धन्यवाद
टिप्पणी पोस्ट करा