आपद्गतं हससि किं द्रविणान्धमूढ
लक्ष्मी: स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् |
एतान् प्रपश्यसि घटान् जलयन्त्रचक्रे
रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः ||
- संपत्तीमुळे आंधळ्या झालेल्या हे मूर्ख माणसा, संकटात सापडलेल्या माणसाला का हसत आहेस? लक्ष्मी (पैसा) एका ठिकाणी स्थिर रहात नाही यात विचित्र ते काय ? विहिरीवर ह्या रहाटाला लावलेला घडा बघ, रिकामा झालेला परत भरतो आणि भरलेला परत रिकामा होतो.
६ टिप्पण्या:
The word should be 'mooDha' (vocative), not 'mooDhaH' which is the nominative form.
- dn
आपद्गतं हससि किं द्रविणान्ध मूढ:
लक्ष्मीस्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् |
एतान् प्रपश्यसि घटां जलयन्त्रचक्रे
रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः ||
---
I remember it as लक्ष्मी: स्थिरा ...
'घटां जलयन्त्रचक्रे' should probably be घटांजलयन्त्रचक्रे .
(मूढ: is surely wrong, as already mentioned. It is : मूढ.)
(हे) द्रविणान्ध मूढ, (त्वं) आपद्गतं किम् हससि?)
'घटान्' हा शब्द घटां असा अनुस्वार वापरून लिहिता येत नाही. 'म्' चा अनुस्वार होतो, 'न्' चा होत नाही. रामम् = रामं, पण 'राजन्' शब्द (इतर संधी न झाल्यास) तसाच लिहावा लागतो. तेव्हा तो शब्द संधी होऊन 'घटांजलयन्त्रचक्रे' असाच असणार.
दुसरी गोष्ट म्हणजे ईकारान्त स्त्रीलिंगी शब्दाची प्रथमेची रूपे: नदी-नद्यौ-नद्य: असताना 'लक्ष्मी' शब्द 'लक्ष्मी:' असा कसा झाला? तर असे आठ ईकारान्ती स्त्रीलिंगी शब्द आहेत ज्यांच्या प्रथमा एकवचनाला विसर्ग लागतो. त्यातले सात धरून एक श्लोकच होतो, ज़ो तुमच्या मालेत तुम्ही घेऊ शकाल. अवी:, तंत्री:, तरी:, लक्ष्मी:, ह्री: (ह्री:), धी:, श्री: हे ते शब्द. आणि श्लोकात नसलेला 'स्तरी:' शब्द 'स्तरी'चं प्रथमा एकवचन आहे.
अवीतन्त्रीतरीलक्ष्मीह्रीधीश्रीणामुणादिषु ।
सप्तानामपिशब्दानां सुलोपो न कदाचन ।
देव + सु -> देव: (हे कसं, मला माहीत नाही.)
नदी + सु -> 'सु' (e)lop(e)s -> नदी
लक्ष्मी + सु -> न 'सु'-लोपो (श्लोकात सांगितल्याप्रमाणे) -> लक्ष्मी: .
तेव्हा 'लक्ष्मीस्थिरा' चूक आहे, 'लक्ष्मी: स्थिरा' असे दोन वेगळे शब्दच तिथे हवेत.
द्रविणान्ध मूढ -> द्रविणान्धमूढ (one word)
घटां जलयन्त्रचक्रे -> घटांजलयन्त्रचक्रे
तुम्ही म्हणाल काय ताप आहे. पण आम्हाला एक मास्तर होता. धोतर नेसायचा आणि सगळं लक्ष (सगळ्याच धोतरवाल्यांप्रमाणे) पेपर फोडण्यात, काड्या लावण्यात आणि पोरींकडे. पण त्या मास्तरचा एक आग्रह आता पटतो आहे. श्लोक पुस्तकात आहे तसाच लिहायचा. आपलं डोकं वापरायचं नाही. पुस्तकात 'आनन्द' असेल तर लिहितानाही 'आनन्द'च, 'आनंद' नाही. पण अशी खबरदारी का आवश्यक आहे हे तो बाबाजी बोलला नाही. आणि मूळ पुस्तकातच चूक असेल तर? तर मग निदान भाषेच्या खुनाची ज़बाबदारी आपल्यावर येत नाही.
आता 'घटान्' हे द्वितीया बहुचवन आहे. 'म्'-ऐवजी अनुस्वार (माधवम् = माधवं) चालतो. पण न् हा तसाच लिहायला हवा. (विस्मयो मे महान् राजन्). तेव्हा घटान् चा घटां होत नाही. घटान् + जलxxxx = घटांजलxxxx वा घटाञ्जलxxxx, असा तो शब्द असावा. ही संधी होत नसेल तर मग 'घटान् जलxxxx'.
नियम माहीत नाही, पण बहुतेक ती संधी होते.
तुम्ही सहसा चांगले श्लोक निवडता, पण आज़चा चुटकीवरचा श्लोक (२९-मार्च-२०११) भंकस आहे. अनेक कोडी ओढूनताणून आणली असतात.
One more comment? It is almost amounting to harassment of the original poster now. But yesterday I asked a Samskrit scholar why there is no sandhi for एतान् & प्रपश्यसि, but घटान् + जल becomes घटांजलxxxx. And he told me that there should be no sandhi there as well. Of course, घटान् does not change to घटां when it stands alone. So it is :
एतान् प्रपश्यसि घटान् जलयन्त्रचक्रे
I also learned one interesting thing. For Shankar, Girish and Gireesh are both valid names. The std one we know is gireesh = giri + eesh, like ramaa/bhaava/umaa + iish for ramesh-umesh-bhaavesh. But girish=giri + sh. sh=one-who-sleeps. So Shankara, the God who sleeps in the mountains, is 'girisha'.
Thanks to your blog, the vast gaps in my 'knowledge' are being plugged. The improvements may be ever so tiny, but each step counts. You are also quite diligent about correcting errors, which has given me susanskruta-anubhav on this sanskrutaanubhava blog. But I am never happy if I am not complaining about *some*thing, and right now my protest is that your own lalit blog does not get updated more often. You write well but you don't write all that much. Of course it is far better to write sparingly than filling up the blog with ten junk entries per day.
टिप्पणी पोस्ट करा