आरभ्यते न खलु विघ्नभयेन नीचै:
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्या: |
विघ्नै: पुन: पुनरपि प्रतिहन्यमाना:
प्रारभ्य चोत्तमजना: न परित्यजन्ति ||
- कामात अडथळे येतील या भीतीने कामच सुरू न करणारे लोक नीच (अतिशय कमी) प्रतीचे , काम चालू असताना मधेच अडथळे आले तर ते अर्धवट सोडून देणारे लोक मध्यम प्रतीचे तर कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करून पुन्हा पुन्हा काम सुरू ठेवणारे लोक अतिशय उत्तम प्रतीचे असतात.
1 टिप्पणी:
> ....
> प्रारभ्य चोत्तमजना: न परित्यजन्ति ||
>
अनारम्भो हि कार्याणाम् प्रथमम् बुद्धिलक्षणम्
प्रारब्धस्यान्तगमनम् द्वितीयं बुद्धिलक्षणम्
- हे सुभाषित शालेय अभ्यासक्रमात होते. तुम्ही सादर केलेल्या आणि वरील वचनांचा शेवट सारखाच असला तरी प्रारम्भ किती भिन्न आहे, हा एक मजेचा भाग आहे. एक सुभाषित काम हाती घेण्याचे टाळणे हे नीच प्रतीचे समज़ते, तर दुसरे सुभाषित कामाला सुरवातच न करणे हे बुद्धीचे निदर्शक मानते.
टिप्पणी पोस्ट करा