दानं प्रियवाक्सहितं ज्ञानमगर्वं क्षमान्वितं शौर्यम् |
वित्तं त्यागसमेतं दुर्लभमेतच्चतुर्विधं भद्रम् ||- चांगले शब्द बोलून दिलेले दान (प्रिय असे बोलणारा दानी माणूस ), गर्वरहित ज्ञान ( नम्र विद्वान) , क्षमेने परिपूर्ण असे शौर्य (क्षमाशील शूर माणूस) आणि त्यागाची जोड असलेले धन ( त्याग करू शकणारा श्रीमंत) ह्या चार कल्याणकारी आणि तितक्याच दुर्मिळ गोष्टी आहेत.