पृष्ठे

ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यावज्ञां
जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः |
उत्पद्यते हि मम कोSपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ||

- भवभूती (मालतीमाधव)

- जे कोणी आमच्याबद्दल वेडीवाकडी मते पसरवीत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावे की हे काव्य किंवा लिखाणाचा प्रयत्न त्यांच्यासाठी नाही. कधीतरी माझे काव्य समजणारा कोणी समानधर्मी जन्माला येईलच. हा काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे.

२ टिप्पण्या:

Naniwadekar म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Naniwadekar म्हणाले...

ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यावज्ञां
जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः
- - -

माझ्या माहितीनुसार 'तान् प्रति' या शब्दांमध्ये सन्धि होत नाही, आणि ते स्वतन्त्रच लिहावे लागतात. पण या नियमाबद्दल मला नक्की खात्री नाही. ते शब्द स्वतन्त्र लिहिणे हा विकल्प मात्र नक्कीच व्याकरणमान्य आहे.

आणि, प्रथयन्त्यवज्ञां - 'त्या' नाही, तर 'त्य'. प्रथयन्ति + अवज्ञाम्. 'प्रथयन्ति' म्हणजे पसरवणे, असा 'प्रथ् - प्रथयति/प्रथयते' या धातूचा अर्थ शब्दकोशात दिला आहे .