चातकस्त्रिचतुरान् पयःकणान् याचते जलधरं पिपासया |
सोSपि पूरयति विश्वमम्भसा हन्त हन्त महतामुदारता ||
- तहानेमुळे चातक पक्षी ढगांकडे फक्त तीन-चार पाण्याच्या थेंबांची याचना करतो .पण ढग मात्र सर्व विश्वच पाण्याने भरून टाकतो. काय ही मोठ्या माणसांची उदार वृत्ती !!
५ टिप्पण्या:
सुंदर! 'Be agressively good' असे का म्हणतात ते समजले.
चातकस्त्रिचतुरान् पयःकणान्
याचते जलधरं पिपासया ।
सोऽपि पूरयति विश्वमंभसा
हन्त हन्त महतामुदारता ॥
(चतुरान्, आणि ***मंभ***)
हे रथोद्धता नावाचे वृत्त आहे. (रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्, या रामरक्षेतल्या ओळी याच छन्दात आहेत.) यातले नवव्या-दहाव्या वर्णावरचे लघु-गुरु बदलले की झाला स्वागता छन्द: 'पुष्पवर्ण नटला पळसाचा'.
तुमच्या एका सुभाषितातली चूक तुम्ही बदललेली नाही. 'गतो/गत: शोको' ऐवजी 'गते शोको' हवे. तिथे सप्तमीचा वापर आहे, प्रथमेचा नाही.
I should perhaps mention that my instincts are very comfortable with the use of prathamaa in गत: शोको. As for the use of locative (saptami) there, I am ill at ease with it even after deliberately trying to get myself in tune with the usage. But internet search firmly points to 'गते' only.
- dn
अज़ून एक आवश्यक सुधारणा म्हणजे तुमच्या दुसर्या स्तंभाचे नांव 'मासामाजी' वा त्रैमासामाजी वा वर्षामाजी -- काही तरी लिहावे, असे करायची वेळ आली आहे. २०११ चा पहिला क्वार्टर तर कधीच गेला. दुसराही आता अर्धाअधिक गेलाय. बिचार्या असमर्थ रामदासांची मूळ ओळ कोणीच कधीच भुजंगप्रयातात लिहीत नाही, आणि इतक्यात तर तुम्ही काहीच कशातच (गद्यात वा पद्यात) लिहिलेले नाही. लिहा, लिहा, काही तरी. लवकर लिहा. एरवी आपला दुसरा ब्लॉगही आहे, हेच तुम्ही विसरून जायची शक्यता आहे.
- डी एन
ते शतं हि वयं पञ्च स्वकीये विग्रहे सति ।
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम्
टिप्पणी पोस्ट करा