पृष्ठे

उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा |
सम्पत्तौ च विपत्तौ च महतामेकरूपता ||

- उगवताना सूर्य लाल असतो तसाच तो मावळतानाही लाल असतो. अशाप्रकारे महान (थोर) लोक समृद्धीच्या आणि संकटाच्या अशा दोन्ही काळात एकसारखेच वागतात.

म्हणजेच संकटाने घाबरत नाहीत किंवा समृद्धीच्या काळात हुरळून जात नाहीत.

५ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

उदये सविता
रक्तः
-- रक्तः -> rakto

आश्लेषा म्हणाले...

विसर्गापुढे "र्" हे व्यंजन आले असता विसर्गाचा "र्" होतो. "र्" पुढे "र्" आल्याने पूर्वीच्या "र्" चा लोप होतो.त्यामुळे रक्तो होणार नाही.

अनामित म्हणाले...

राम: राजमणि: ->
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे

मी 'रामं रमेशं भजे' वर शोधलं तेव्हा एकच 'राम: राजमणि:' चा उल्लेख दिसला, बाकी सगळे 'रामो राजमणि:', आणि मी 'रामो राजमणि:' च शिकलो आहे. 'श्रीरामो रामभद्रश्च' असे वेंकटेशस्तोत्रातही शब्द आहेत. तेव्हा माझी ९९.९% खात्री आहेच. तरी मी ज़ाणकारांना उरलेल्या ०.१ टक्क्यासाठी विचारतो.

सोत्तीर्णा खलु पाण्डवै: रणनदी : मधे विसर्गाचा र्‌ होतो, पण तो लोप पावतो आणि 'पाण्डवै रणनदी' असे शब्द मिळतात. त्या न्यायानी 'रक्त: रबबब' -> 'रक्त रबबबब' होईल. विसर्गाच्या आधी अ-कार आहे, की उ-कार की ऐ-कार वगैरे भेदांवर हे नियम अवलम्बून असतील.

- डी एन

Naniwadekar म्हणाले...

By the way, some scholars subscribe to the view that the first part of a verse (रक्तः) is not necessarily subject to change by the second part, and apparently Veda-pandits have to be able to utter a verse in 10+ different ways. I don't know about it, but laukik poetry definitely has instances where the odd-numbered paad is absolutely subjected to sandhi by the succeeding even-numbered paad. Check line 3 of Geeta 2.22 or line 3 of Mahimna.17 if you are really interested in the issue and how the metre is destroyed in each case if no rule of sandhi is effected.

At any rate, the reason cited by you is wrong because it would change 'raktaH' to just 'rakta'.

I will update you after I hear back about this issue.

- dn

Naniwadekar म्हणाले...

Confirming that रक्तः should change to रक्तो ...

- dn