पृष्ठे

केयूरा न विभूषयन्ति पुरुषं, हारा न चंद्रोज्वलाः
न स्नानं, न विलेपनं, न कुसुमं, नालङ्कृता मूर्धजा: |
वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ||

- माणसाला केयूरामुळे (दंडावरील अलंकार) शोभा येत नाही किंवा चंद्राप्रमाणे तेजस्वी हाराने देखील नाही. स्नान केल्याने, सुगंधी द्रव्याने मालिश केल्याने, फुलांमुळे किंवा केस सुशोभीत केल्याने सुद्धा नाही.सुसंस्कृत वाचा (बोलणे) माणसाला अलंकृत करते. इतर सर्व अलंकार हळू हळू नष्ट होत जातात पण उत्तम वाचा हे खरे भूषण आहे (कारण ते कायम बरोबर रहाते).

५ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

श्रोत्रं श्रुतेनैव न कुण्डलेन
दानेन पाणिर्न तु कंकणेन ।
विभाति कायः करुणापराणाम्
परोपकारैर्न तु चन्दनेन ।।
(भर्तृहरि, नीतिशतक)
भर्तृहरीचा भर सुसंस्कृत भाषणापेक्षा परोपकारी वर्तनावर जास्त आहे. पण शेवटी दोन्ही श्लोकांचा मथितार्थ एकच. श्रोत्र श्रुतिश्रवणानी (श्रुति=वेद) धन्य होतात, हा सु-भाषणाचा उल्लेख तिथेही आहेच. मराठीतला 'काया' हा स्त्रीलिंगी शब्द मूळ पुंलिंगी आहे.

श्रुतेचि की श्रोत्र, न कुंडलाने
दानेचि की पाणि, न कंकणाने
साज़े तसा देहहि हा न आने
परोपकारेचि, न चंदनाने
(भाषान्तरकार: वामन पंडित)

अनामित म्हणाले...

चंद्रोज्वलाः
---
ujjavalaaH (double-j)

अनामित म्हणाले...

Oh, well. केयूरा न विभूषयन्ति पुरुषं is also Bhartruhari's, and it is followed by the following verse:

विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम्
विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः ।
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतम्
विद्या राजसु पूज्यते न हि धनं विद्याविहीनः पशुः ॥

(Hindi lines copied from the net...)
विद्या इन्सान का विशिष्ट रुप है, गुप्त धन है । वह भोग देनेवाली, यशदात्री, और सुखकारक है । विद्या गुरुओं का गुरु है, विदेश में वह इन्सान की बंधु है । विद्या बडी देवता है; राजाओं में विद्या की पूजा होती है, धन की नहि । इसलिए विद्याविहीन पशु हि है ।

The verse श्रोत्रं श्रुतेनैव follows much later, at number 71, in the copy which I have with me.

अनामित म्हणाले...

देवस्थळींच्या शब्दकोशात केयूरासाठी 'वांकी' हा मराठी शब्द दिला आहे. या सुभाषितकारांचं काही खरं नाही. एकीकडे केयूराला शिव्याही देतात, आणि दुसरीकडे 'केयूरवान्‌, मकर-कुण्डलवान्‌' ही माहितीही विष्णु-स्तुतीत गौरवपर वर्णनांत देतात.

अनामित म्हणाले...

> केयूरा न ... चंद्रोज्वलाः - न स्नानं
------
चंद्रोज्ज्वला (double-j, no visarga)

You should imagine that lines 1-2 (or 3-4, but 2-3) are written on one single line only, and apply the rules of grammar. You may even actually write (not just imagine) two lines of a verse on a single line on paper, because some people do observe that practice, and with good reason.

Now, then. Just as केयूरा: न changes to केयूरा न,
चन्द्रोज्ज्वला: - न स्नानं
changes to चन्द्रोज्ज्वला - न स्नानं.

aa+visarga followed by a word which begins with a soft consonant -> the visarga is lost.

soft consonants= मृदु व्यंजन = य र ल व plus 3-4-5 from each varga (da-dha-na out of ta-tha-da-dha-na).